चित्रपटांतील स्त्री प्रतिनिधित्व, मानधन आणि प्रेक्षकपसंतीचे मानसशास्त्र अद्वैता देशमुख ०४ जानेवारी २०२१

अपवादामुळे नियम आणखीच स्पष्ट होतात असे म्हणतात. अगदी तसेच विद्या बालन आणि नंतर काही प्रमाणात दीपिका पदुकोण व कंगना राणावत यांच्या उठून दिसणार्‍या कारकीर्दीमुळे सध्याचे स्त्री कलाकारांचे चित्रपटक्षेत्रातील एकंदर दुय्यम स्थान अधोरेखित झाले. आवडो किंवा न आवडो, चित्रपटांचा जीवनावर आणि जनमानसावर होणारा परिणाम नाकारता येत नाही. कला ही समाजाचे प्रतिबिंब दाखवते, त्याच वेळी समाजाला पुढे नेण्याचीही कामगिरी …